मराठी

आपल्या उपकरणावर ही डाउनलोड सेवा समर्थन देत नसली तरी त्यावर डाउनलोड करण्याविषयीची माहिती पाहता येऊ शकते. कंप्युटरवर डाउनलोड करण्यासाठी लागणाऱ्या लिंक्स ई-मेलवरून पाठविल्या जाऊ शकतात.

COOLPIX A100 फर्मवेअर

आपली परिचालन प्रणाली निवडा.

  • Windows
  • Mac OS

हा फर्मवेअर अद्यतन कार्यक्रम वरती सूचीबद्ध केलेल्या ग्राहक-मालकी उपकरणासाठी आहे ("प्रभावित उत्पादन"), आणि तो केवळ खाली सूचीबद्ध केलेल्या अंतिम वापरकर्ता परवाना करार (EULA) च्या स्वीकृतीनंतरच प्रदान केले जातो. “स्वीकारा” निवडून आणि “डाउनलोड” क्लिक करून, आपण आणि NIKON कॉर्पोरेशन ("NIKON") दरम्यान अंतिम वापरकर्ता परवाना करार स्थापन करणाऱ्या EULA अटी आणि नियम यांना आपण स्वीकृती देणे आवश्यक ठरते. डाउनलोड सुरू करण्यापूर्वी कराराच्या अटी आपणास समजल्या आहेत याची खात्री करा.

  • • ही सेवा COOLPIX A100 कॅमेर्‍यांसाठीच्या फर्मवेअरना 1.1 संस्करणामध्ये अद्यतन करण्यासाठी वापरता येऊ शकतील असे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देते. पुढे जाण्यापूर्वी, कॅमेरा सेटअप मेनूमध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि कॅमेऱ्याचे फर्मवेअर संस्करण तपासा. वर सूचीबद्ध केलेले फर्मवेअर आधीच प्रस्थापित केलेले असल्यास आपल्याला हे अद्यतन डाउनलोड किंवा प्रस्थापित करण्याची आवश्यकता नाही.
  • • या अद्यतनामध्ये पूर्वीच्या अद्यतनांमध्ये केलेले सर्व बदल समाविष्ट आहेत.
  • • पुढे जाण्यापूर्वी खाली दिलेली माहिती वाचा.
फर्मवेअर संस्करण 1.0  ते 1.1 यांच्यामध्ये झालेले बदल
  • • जेव्हा सेटअप > वेळ क्षेत्र व तारीख > वेळ क्षेत्र सब-मेनूमधून Home वेळ क्षेत्र किंवा प्रवास इष्टस्थळ निवडले जाते तेव्हा प्रदर्शनावर आता केवळ सध्याच्या निवडक झोनमधील प्रमुख शहरांची नावे दाखविली जातात.
कॅमेरा फर्मवेअर संस्करण पाहणे
  1. कॅमेरा चालू करा.
  2. मेनू प्रदर्शित करण्यासाठी कॅमेर्‍याचे MENU बटण दाबा.
  3. मेनू प्रतीके प्रदर्शित करण्यासाठी मल्टी सिलेक्टर डावीकडे दाबा, नंतर सेटअप हायलाइट करा आणि OK दाबा.
  4. सेटअप मेनूमध्ये फर्मवेअर संस्करण हायलाइट करा आणि कॅमेऱ्याचे फर्मवेअर संस्करण प्रदर्शित करण्यासाठी OK दाबा.
  5. कॅमेरा फर्मवेअर संस्करण तपासा.
  6. कॅमरा बंद करा.
उत्पादन विवरण
नाव COOLPIX A100 फर्मवेअर संस्करण 1.1
समर्थित कॅमेरे COOLPIX A100
समर्थित फर्मवेअर संस्करण संस्करण 1.0
फाईल नाव F-A100-V11W.exe
ऑपरेटिंग सिस्टिम
  • Microsoft Windows 10 Home
  • Microsoft Windows 10 Pro
  • Microsoft Windows 10 Enterprise
  • Microsoft Windows 8.1
  • Microsoft Windows 8.1 Pro
  • Microsoft Windows 8.1 Enterprise
  • Microsoft Windows 7 Home Basic
  • Microsoft Windows 7 Home Premium
  • Microsoft Windows 7 Professional
  • Microsoft Windows 7 Enterprise
  • Microsoft Windows 7 Ultimate
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. संगणकाच्या हार्ड डिस्कवर एक फोल्डर तयार करा आणि त्यास आपल्या इच्छेनुसार नाव द्या.
  2. पायरी 1 मध्ये तयार केलेल्या फोल्डरवर F-A100-V11W.exe डाउनलोड करा.
  3. नवीन फोल्डरमधील उप-फोल्डरवर फर्मवेअर एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी F-A100-V11W.exe रन करा. परिणामी मिळणारे फाइल आणि फोल्डर हाइरार्कि खाली दर्शविली आहे:
    • firmware (फर्मवेअर असलेले उप-फोल्डर)
    • firmware.bin (कॅमेरा फर्मवेअर, “firmware” फोल्डरमध्ये स्थित)
  4. कार्ड स्लॉट किंवा कार्ड रीडर याचा वापर करून कॅमेर्‍यामध्ये स्वरूपित केलेल्या मेमरी कार्डवर “firmware” फोल्डरची प्रतिलिपी करा.
    नोट: मेमरी कार्डाच्या रूट (सर्वात वरच्या) डिरेक्टरीमधील “firmware” फोल्डरमध्ये खात्रीपूर्वक प्रतिलिपित करा. जर नवीन फर्मवेअर रूट डिरेक्टरीमधल्या फोल्डरमध्ये ठेवले असेल तर कॅमेरा ते ओळखणार नाही.
  5. कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड घालून कॅमेरा चालू करा.
  6. सेटअप मेनूमध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  7. अद्यतन पूर्ण झाल्यानंतर, कॅमेरा बंद करा आणि मेमरी कार्ड बाहेर काढा.
  8. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतन झाले आहे याची पुष्टी करा.

नोट: फर्मवेअर अद्ययावत करण्यापूर्वी कॅमेऱ्याच्या आंतरिक मेमरीमध्ये संग्रहित केलेल्या प्रतिमांचा आपण बॅकअप घेऊन ठेवण्याची आम्ही शिफारस करतो. आंतरिक मेमरीमधून मेमरी कार्डावर प्रतिमांची प्रत तयार करण्याविषयीच्या माहितीसाठी कॅमेऱ्याची सूचना-पुस्तिका पहा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
CPX_MS_FirmUp_Win_En.pdf (PDF) (0.17 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

उत्पादन विवरण
नाव COOLPIX A100 फर्मवेअर संस्करण 1.1
समर्थित कॅमेरे COOLPIX A100
समर्थित फर्मवेअर संस्करण संस्करण 1.0
फाईल नाव F-A100-V11M.dmg
ऑपरेटिंग सिस्टिम
  • macOS High Sierra संस्करण 10.13
  • macOS Sierra संस्करण 10.12
  • OS X 10.11.6
  • OS X 10.10.5
  • OS X 10.9.5
  • OS X 10.8.5
  • OS X 10.7.5
  • Mac OS X 10.6.8
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. F-A100-V11M.dmg डाउनलोड करा.
  2. खालील फाईल आणि फोल्डर असलेली डिस्क प्रतिमा माउंट करण्यासाठी F-A100-V11M.dmg प्रतिकावर दोनदा क्लिक करा:
    • firmware (फर्मवेअर असलेले उप-फोल्डर)
    • firmware.bin (कॅमेरा फर्मवेअर, “firmware” फोल्डरमध्ये स्थित)
  3. कार्ड स्लॉट किंवा कार्ड रीडर याचा वापर करून कॅमेर्‍यामध्ये स्वरूपित केलेल्या मेमरी कार्डवर “firmware” फोल्डरची प्रतिलिपी करा.
    नोट: मेमरी कार्डाच्या रूट (सर्वात वरच्या) डिरेक्टरीमधील “firmware” फोल्डरमध्ये खात्रीपूर्वक प्रतिलिपित करा. जर नवीन फर्मवेअर रूट डिरेक्टरीमधल्या फोल्डरमध्ये ठेवले असेल तर कॅमेरा ते ओळखणार नाही.
  4. कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड घालून कॅमेरा चालू करा.
  5. सेटअप मेनूमध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  6. अद्यतन पूर्ण झाल्यानंतर, कॅमेरा बंद करा आणि मेमरी कार्ड बाहेर काढा.
  7. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतन झाले आहे याची पुष्टी करा.

नोट: फर्मवेअर अद्ययावत करण्यापूर्वी कॅमेऱ्याच्या आंतरिक मेमरीमध्ये संग्रहित केलेल्या प्रतिमांचा आपण बॅकअप घेऊन ठेवण्याची आम्ही शिफारस करतो. आंतरिक मेमरीमधून मेमरी कार्डावर प्रतिमांची प्रत तयार करण्याविषयीच्या माहितीसाठी कॅमेऱ्याची सूचना-पुस्तिका पहा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
CPX_MS_FirmUp_Mac_En.pdf (PDF) (0.14 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

अंतिम उपभोक्ता परवाना करार

PDF फाईल्स विनामुल्य Adobe® Reader® सॉफ्टवेअर वापरून पाहिल्या जाऊ शकतात.
Adobe® Reader® डाउनलोड करा.