मराठी

आपल्या उपकरणावर ही डाउनलोड सेवा समर्थन देत नसली तरी त्यावर डाउनलोड करण्याविषयीची माहिती पाहता येऊ शकते. कंप्युटरवर डाउनलोड करण्यासाठी लागणाऱ्या लिंक्स ई-मेलवरून पाठविल्या जाऊ शकतात.

COOLPIX P900 फर्मवेअर

आपली परिचालन प्रणाली निवडा.

  • Windows
  • Mac OS

हा फर्मवेअर अद्यतन कार्यक्रम वरती सूचीबद्ध केलेल्या ग्राहक-मालकी उपकरणासाठी आहे ("प्रभावित उत्पादन"), आणि तो केवळ खाली सूचीबद्ध केलेल्या अंतिम वापरकर्ता परवाना करार (EULA) च्या स्वीकृतीनंतरच प्रदान केले जातो. “स्वीकारा” निवडून आणि “डाउनलोड” क्लिक करून, आपण आणि NIKON कॉर्पोरेशन ("NIKON") दरम्यान अंतिम वापरकर्ता परवाना करार स्थापन करणाऱ्या EULA अटी आणि नियम यांना आपण स्वीकृती देणे आवश्यक ठरते. डाउनलोड सुरू करण्यापूर्वी कराराच्या अटी आपणास समजल्या आहेत याची खात्री करा.

  • • ही सेवा COOLPIX P900 कॅमेर्‍यांसाठीच्या फर्मवेअरना 1.5 संस्करणामध्ये अद्यतन करण्यासाठी वापरता येऊ शकतील असे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देते. पुढे जाण्यापूर्वी, कॅमेरा सेटअप मेनूमध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि कॅमेऱ्याचे फर्मवेअर संस्करण तपासा. वर सूचीबद्ध केलेले फर्मवेअर आधीच प्रस्थापित केलेले असल्यास आपल्याला हे अद्यतन डाउनलोड किंवा प्रस्थापित करण्याची आवश्यकता नाही.
  • • या अद्यतनामध्ये पूर्वीच्या अद्यतनांमध्ये केलेले सर्व बदल समाविष्ट आहेत.
  • • पुढे जाण्यापूर्वी खाली दिलेली माहिती वाचा.

नोट: या पॅकेजमध्ये दोन अद्यतने समाविष्ट आहेत: पहिले अद्यतन कॅमेऱ्यासाठीच आणि दुसरे GPS मोड्यूलसाठी. आपण पहिले अद्यतन पूर्ण केल्यानंतर कॅमेरा पुन्हा चालू करता तेव्हा दुसरे अद्यतन सुरू होईल.

फर्मवेअर संस्करण 1.4  ते 1.5 यांच्यामध्ये झालेले बदल
  • • जेव्हा सेटअप > वेळ क्षेत्र व तारीख > वेळ क्षेत्र सब-मेनूमधून Home वेळ क्षेत्र किंवा प्रवास इष्टस्थळ निवडले जाते तेव्हा प्रदर्शनावर आता केवळ सध्याच्या निवडक झोनमधील प्रमुख शहरांची नावे दाखविली जातात.
पूर्वीच्या संस्करणांपासून झालेले बदल
फर्मवेअर संस्करण 1.3  ते 1.4 यांच्यामध्ये झालेले बदल
  • • पुढील समस्यांचे निवारण केले:
    • - काही विशिष्ट ठिकाणी, स्थान डेटा काहीवेळा चुकीचा, अनुपलब्ध किंवा अनियमितपणे प्रदर्शित होत होता.
    • - कॅमेऱ्याच्या (पोर्ट्रेटवरून लँडस्केपवर किंवा त्याउलट) बदलांचे अनुसरण करण्यात प्रदर्शन काही वेळा अयशस्वी ठरत होते.
    • - 1800 शॉट्सनंतर मध्यांतर समयक छायाचित्रण समाप्त होत होते.
    • - कॅमेरा चंद्र मोडमध्ये चित्रपट चित्रित करत असताना काही वेळा पॉवर स्विच व्यतिरिक्तच्या नियंत्रणास प्रतिसाद देत नव्हता.
फर्मवेअर संस्करण 1.2  ते 1.3 यांच्यामध्ये झालेले बदल
  • • हाँगकाँग, मकाऊ आणि तैवान येथे योग्यरीतीने प्रदर्शित न होणाऱ्या पॉइंट्स ऑफ इंस्ट्रेस्ट (POI) समस्येचे निवारण केले.
फर्मवेअर संस्करण 1.1  ते 1.2 यांच्यामध्ये झालेले बदल
  • • जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तू कॅमेऱ्याच्या अगदी मागे होती तेव्हा पर्यायी ML-L3 दूरस्थ नियंत्रणाचा वापर करून शटर रिलीज होण्यास प्रतिबंध करणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. तथापि ML-L3 चा वापर करताना, आपण कॅमेरा सेटअप मेनूमध्ये EVF स्वयं-आळीपाळीने साठी बंद निवडणे आवश्यक आहे.
  • • ज्या बगमुळे चलचित्र ध्वनिमुद्रण चालू असताना पर्यायी ML-L3 दूरस्थ नियंत्रण वापरून केवळ एकदाच शटर रिलीज होऊ शकले, आणि ज्यामुळे नंतर चलचित्र-ध्वनिमुद्रण बटण वापरून चलचित्र ध्वनिमुद्रण समाप्त करता आले नाही त्या बगचे निर्धारण केले.
फर्मवेअर संस्करण 1.0  ते 1.1 यांच्यामध्ये झालेले बदल
  • • खालील समस्यांचे निराकरण केले ज्या, जेव्हा प्रदर्शक आणि इलेक्ट्रॉनिक दृश्यदर्शकामध्ये स्विच करण्यासाठी नेत्र संवेदकाचा वापर केला जातो तेव्हा काही अपवादात्मक परिस्थितींमध्ये उद्भवू शकतात:
    • - प्रतिमा योग्य पद्धतीने प्रदर्शित होणार नाहीत किंवा जतन केल्या जात नाहीत
    • - कॅमेरा फ्रीज होतो किंवा कार्य करणे थांबवतो
कॅमेरा फर्मवेअर संस्करण पाहणे
  1. कॅमेरा चालू करा.
  2. मेनू प्रदर्शित करण्यासाठी कॅमेर्‍याचे MENU बटण दाबा.
  3. मेनू प्रतीके प्रदर्शित करण्यासाठी मल्टी सिलेक्टर डावीकडे दाबा, नंतर सेटअप हायलाइट करा आणि OK दाबा.
  4. सेटअप मेनूमध्ये फर्मवेअर संस्करण हायलाइट करा आणि कॅमेऱ्याचे फर्मवेअर संस्करण प्रदर्शित करण्यासाठी OK दाबा.
  5. कॅमेरा फर्मवेअर संस्करण तपासा.
  6. कॅमरा बंद करा.
उत्पादन विवरण
नाव COOLPIX P900 फर्मवेअर संस्करण 1.5
समर्थित कॅमेरे COOLPIX P900
समर्थित फर्मवेअर संस्करण संस्करण 1.0-1.4
फाईल नाव F-P900-V15W.exe
ऑपरेटिंग सिस्टिम
  • Microsoft Windows 10 Home
  • Microsoft Windows 10 Pro
  • Microsoft Windows 10 Enterprise
  • Microsoft Windows 8.1
  • Microsoft Windows 8.1 Pro
  • Microsoft Windows 8.1 Enterprise
  • Microsoft Windows 7 Home Basic
  • Microsoft Windows 7 Home Premium
  • Microsoft Windows 7 Professional
  • Microsoft Windows 7 Enterprise
  • Microsoft Windows 7 Ultimate
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. संगणकाच्या हार्ड डिस्कवर एक फोल्डर तयार करा आणि त्यास आपल्या इच्छेनुसार नाव द्या.
  2. पायरी 1 मध्ये तयार केलेल्या फोल्डरवर F-P900-V15W.exe डाउनलोड करा.
  3. नवीन फोल्डरमधील उप-फोल्डरवर फर्मवेअर एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी F-P900-V15W.exe रन करा. परिणामी मिळणारे फाइल आणि फोल्डर हाइरार्कि खाली दर्शविली आहे:
    P900Update
    - firmware (फर्मवेअर समाविष्ट असलेले सब-फोल्डर)
     - firmware.bin (“firmware” फोल्डरमध्ये असलेले कॅमेरा फर्मवेअर)
     - gpsfirm.bin (“firmware” फोल्डरमध्ये असलेले GPS मोड्यूलचे फर्मवेअर)
  4. कार्ड स्लॉट किंवा कार्ड रीडर याचा वापर करून कॅमेर्‍यामध्ये स्वरूपित केलेल्या मेमरी कार्डवर “firmware” फोल्डरची प्रतिलिपी करा.
    नोट: मेमरी कार्डाच्या रूट (सर्वात वरच्या) डिरेक्टरीमधील “firmware” फोल्डरमध्ये खात्रीपूर्वक प्रतिलिपित करा. जर नवीन फर्मवेअर रूट डिरेक्टरीमधल्या फोल्डरमध्ये ठेवले असेल तर कॅमेरा ते ओळखणार नाही.
  5. मेमरी कार्ड लेखन-संरक्षण (“लॉक”) स्विच “लेखन” (अनलॉक केलेल्या) स्थितीमध्ये असल्याची पुष्टी केल्यानंतर कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड घालून कॅमेरा चालू करा.
  6. सेटअप मेनूमध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  7. अद्यतन पूर्ण झाले असा संदेश प्रदर्शित झाल्यानंतर कॅमेरा बंद करून पुन्हा चालू करा. नंतर GPS मोड्यूलचे फर्मवेअर अद्यतने स्वयंचलिपणे (जर कॅमेरा सामान्यपणे सुरू झाला तर GPS मोड्यूलचे अद्यतन आधीपासूनच पूर्ण झाले आहे) सुरू होईल.
  8. अद्यतन पूर्ण झाले असा संदेश प्रदर्शित झाल्यानंतर कॅमेरा बंद करून मेमरी कार्ड काढून टाका. पहिल्या अद्यतनापेक्षा दुसऱ्या अद्यतनास वेळ लागेल याची नोंद घ्या.
  9. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतनित केले गेले असल्याची पुष्टी करा. वर्तमान फर्मवेअरचे संस्करण 1.5 नसल्यास पहिल्या पायरीपासून अद्यतन पुन्हा सुरू करा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
CPX_GPS_FirmUp_Win_En.pdf (PDF) (0.26 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

उत्पादन विवरण
नाव COOLPIX P900 फर्मवेअर संस्करण 1.5
समर्थित कॅमेरे COOLPIX P900
समर्थित फर्मवेअर संस्करण संस्करण 1.0-1.4
फाईल नाव F-P900-V15M.dmg
ऑपरेटिंग सिस्टिम
  • macOS High Sierra संस्करण 10.13
  • macOS Sierra संस्करण 10.12
  • OS X 10.11.6
  • OS X 10.10.5
  • OS X 10.9.5
  • OS X 10.8.5
  • OS X 10.7.5
  • Mac OS X 10.6.8
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. F-P900-V15M.dmg डाउनलोड करा.
  2. खालील फाईल आणि फोल्डर असलेली डिस्क प्रतिमा माउंट करण्यासाठी F-P900-V15M.dmg प्रतिकावर दोनदा क्लिक करा:
    P900Update
    - firmware (फर्मवेअर समाविष्ट असलेले सब-फोल्डर)
     - firmware.bin (“firmware” फोल्डरमध्ये असलेले कॅमेरा फर्मवेअर)
     - gpsfirm.bin (“firmware” फोल्डरमध्ये असलेले GPS मोड्यूलचे फर्मवेअर)
  3. कार्ड स्लॉट किंवा कार्ड रीडर याचा वापर करून कॅमेर्‍यामध्ये स्वरूपित केलेल्या मेमरी कार्डवर “firmware” फोल्डरची प्रतिलिपी करा.
    नोट: मेमरी कार्डाच्या रूट (सर्वात वरच्या) डिरेक्टरीमधील “firmware” फोल्डरमध्ये खात्रीपूर्वक प्रतिलिपित करा. जर नवीन फर्मवेअर रूट डिरेक्टरीमधल्या फोल्डरमध्ये ठेवले असेल तर कॅमेरा ते ओळखणार नाही.
  4. मेमरी कार्ड लेखन-संरक्षण (“लॉक”) स्विच “लेखन” (अनलॉक केलेल्या) स्थितीमध्ये असल्याची पुष्टी केल्यानंतर कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड घालून कॅमेरा चालू करा.
  5. सेटअप मेनूमध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  6. अद्यतन पूर्ण झाले असा संदेश प्रदर्शित झाल्यानंतर कॅमेरा बंद करून पुन्हा चालू करा. नंतर GPS मोड्यूलचे फर्मवेअर अद्यतने स्वयंचलिपणे (जर कॅमेरा सामान्यपणे सुरू झाला तर GPS मोड्यूलचे अद्यतन आधीपासूनच पूर्ण झाले आहे) सुरू होईल.
  7. अद्यतन पूर्ण झाले असा संदेश प्रदर्शित झाल्यानंतर कॅमेरा बंद करून मेमरी कार्ड काढून टाका. पहिल्या अद्यतनापेक्षा दुसऱ्या अद्यतनास वेळ लागेल याची नोंद घ्या.
  8. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतनित केले गेले असल्याची पुष्टी करा. वर्तमान फर्मवेअरचे संस्करण 1.5 नसल्यास पहिल्या पायरीपासून अद्यतन पुन्हा सुरू करा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
CPX_GPS_FirmUp_Mac_En.pdf (PDF) (0.23 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

अंतिम उपभोक्ता परवाना करार

PDF फाईल्स विनामुल्य Adobe® Reader® सॉफ्टवेअर वापरून पाहिल्या जाऊ शकतात.
Adobe® Reader® डाउनलोड करा.