मराठी

आपल्या उपकरणावर ही डाउनलोड सेवा समर्थन देत नसली तरी त्यावर डाउनलोड करण्याविषयीची माहिती पाहता येऊ शकते. कंप्युटरवर डाउनलोड करण्यासाठी लागणाऱ्या लिंक्स ई-मेलवरून पाठविल्या जाऊ शकतात.

D5500 फर्मवेअर

आपली परिचालन प्रणाली निवडा.

  • Windows
  • Mac OS

हा फर्मवेअर अद्यतन कार्यक्रम वरती सूचीबद्ध केलेल्या ग्राहक-मालकी उपकरणासाठी आहे ("प्रभावित उत्पादन"), आणि तो केवळ खाली सूचीबद्ध केलेल्या अंतिम वापरकर्ता परवाना करार (EULA) च्या स्वीकृतीनंतरच प्रदान केले जातो. “स्वीकारा” निवडून आणि “डाउनलोड” क्लिक करून, आपण आणि NIKON कॉर्पोरेशन ("NIKON") दरम्यान अंतिम वापरकर्ता परवाना करार स्थापन करणाऱ्या EULA अटी आणि नियम यांना आपण स्वीकृती देणे आवश्यक ठरते. डाउनलोड सुरू करण्यापूर्वी कराराच्या अटी आपणास समजल्या आहेत याची खात्री करा.

  • • ही सेवा, D5500 कॅमेरा "C" फर्मवेअरला संस्करण 1.02 वर अद्यतन करण्यासाठी वापरले जाऊ शकणारे सॉफ्टवेअर पुरवते. पुढे जाण्यापूर्वी, कॅमेरा मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि कॅमेऱ्याचे फर्मवेअर संस्करण तपासा. वरती सूचीबद्ध केलेले फर्मवेअर आधीपासूनच प्रस्थापित असल्यास, आपणास हे अद्यतन डाउनलोड किंवा प्रस्थापित करण्याची आवश्यकता नाही.
  • • पुढे जाण्यापूर्वी खाली दिलेली माहिती वाचा.
"C" फर्मवेअर संस्करण 1.01 ते 1.02 पर्यंतचे बदल
  • • पुढील समस्यांचे निवारण केले:
    • - मल्टी सिलेक्टर जर माझा मेनूमध्ये आयटम जोडा > सानुकूल सेटिंग मेनू > c समयक/AE लॉकबरोबर दाबला गेला तर कॅमेरा प्रतिसाद देणे थांबवत असे.
    • - जर ऑटोफोकस संलग्न केलेल्या SB-800 फ्लॅश युनिटबरोबर वापरला तर थेट दृश्य स्पर्श शटर नियंत्रणांना प्रतिसाद म्हणून काहीवेळा शटर रिलीज होत नसे.
    • - ऑटोफोकस आणि इलेक्ट्रॉनिक छिद्र नियंत्रण (ई भिंग प्रकार) अशा दोन्हीस सपोर्ट करणाऱ्या भिंगांच्या थेट दृश्यात घेतलेल्या छायाचित्रांमध्ये चांगली उघडीप ही काहीवेळा शक्य होत नसे.
    • - दृश्यदर्शक छायाचित्रणादरम्यान प्रतिमा पुनरावलोकन सक्षम केले असल्यास, चित्रीकरणानंतर यूजर दृश्यदर्शकावरून त्यांची नजर हटवितात तेव्हा कॅमेरा काहीवेळा सर्वात अलीकडील चित्राच्या ठिकाणाची चित्रीकरण माहिती प्रदर्शित करत असे.
    • - मोड डायल दुसऱ्या सेटिंगवर फिरविल्यानंतर सानुकूल सेटिंग मेनूमध्ये a ऑटोफोकस > a3 अंगभूत AF-साहाय्य प्रदीपक साठी निवडलेला पर्याय संग्रहित करण्यात कॅमेरा काहीवेळा अयशस्वी होत असे.

नोट
एकदा हे फर्मवेअर प्रस्थापित केल्यावर, Camera Control Pro 2 च्या 2.22.0 आणि त्यापूर्वीच्या संस्करणांची Windows आवृत्ती यापुढे कॅमेरा शोधण्यास सक्षम असणार नाही. 2.23.0 किंवा त्यानंतरच्या संस्करणावर अद्ययावत करा.

पूर्वीच्या संस्करणांपासून झालेले बदल
"C" फर्मवेअर संस्करण 1.00 ते 1.01 पर्यंतचे बदल
  • • AF-P DX NIKKOR 18–55​mm f/3.5–5.6G VR आणि AF-P DX NIKKOR 18–55​mm f/3.5–5.6G भिंगे आता समर्थित. जेव्हा AF-P DX NIKKOR 18-55​mm f/3.5-5.6G VR भिंग संलग्न केले जाते, तेव्हा प्रदर्शित झालेल्या छायाचित्र चित्रीकरण मेनू मध्ये ऑप्टिकल VR पर्यायाचा वापर करून कंपन न्यूनीकरण सक्षम किंवा अक्षम करता येऊ शकते. जेव्हा AF-P DX NIKKOR 18–55​mm f/3.5–5.6G VR किंवा AF-P DX NIKKOR 18–55​mm f/3.5–5.6G संलग्न केले जाते तेव्हा सानुकूल सेटिंग मेनू मध्ये समाविष्टीत असलेला a5 AF मोडमध्ये व्यक्तिचलित फोकस रिंग पर्याय सक्षम किंवा अक्षम करता येऊ शकतो.
  • • पुढील समस्यांचे निवारण केले:
    • - चलचित्र प्रत्यक्ष दृश्यामध्ये HDMI द्वारे जोडणी केलेल्या बाह्य रेकॉर्डर्सवर ऑडिओ आऊटपुटमध्ये चार सेकंदाच्या मध्यांतरामध्ये नॉईज येऊ शकतो.
    • - मेनू रीटच करणे > NEF (RAW) प्रोसेसिंग प्रदर्शन मध्ये उघडीप प्रतिपूर्ती साठी ऋणात्मक मूल्य निवडल्यास इच्छित परिणाम दिसून येत नाहीत.
    • - मध्यांतर समयक छायाचित्रणाच्या दरम्यान उघडीप सरलन साठी ON निवडल्यास पहिल्या अतिमात्र उघडीपी नंतरच्‍या सर्व शॉट्समध्‍ये त्‍याचा परिणाम दिसेल.

नोट
एकदा हे फर्मवेअर प्रस्थापित केल्यावर, Camera Control Pro 2 च्या 2.22.0 आणि त्यापूर्वीच्या संस्करणांची Windows आवृत्ती यापुढे कॅमेरा शोधण्यास सक्षम असणार नाही. 2.23.0 किंवा त्यानंतरच्या संस्करणावर अद्ययावत करा.

कॅमेरा फर्मवेअर संस्करण पाहणे
  1. कॅमेरा चालू करा.
  2. कॅमेरा फर्मवेअर संस्करण प्रदर्शित होण्यासाठी कॅमेरा MENU बटण दाबा आणि मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा.
  3. कॅमेरा फर्मवेअर संस्करण तपासा.
  4. कॅमरा बंद करा.
उत्पादन विवरण
नाव D5500 "C" फर्मवेअर संस्करण 1.02
समर्थित कॅमेरे D5500
समर्थित कॅमरा फर्मवेअर संस्करणे "C" फर्मवेअर संस्करण 1.00–1.01
फाईल नाव F-D5500-V102W.exe
ऑपरेटिंग सिस्टिम
  • Microsoft Windows 10 Home
  • Microsoft Windows 10 Pro
  • Microsoft Windows 10 Enterprise
  • Microsoft Windows 8.1
  • Microsoft Windows 8.1 Pro
  • Microsoft Windows 8.1 Enterprise
  • Microsoft Windows 7 Home Basic
  • Microsoft Windows 7 Home Premium
  • Microsoft Windows 7 Professional
  • Microsoft Windows 7 Enterprise
  • Microsoft Windows 7 Ultimate
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. संगणकाच्या हार्ड डिस्कवर एक फोल्डर तयार करा आणि त्यास आपल्या इच्छेनुसार नाव द्या.
  2. पायरी 1 मध्ये तयार केलेल्या फोल्डरवर F-D5500-V102W.exe डाउनलोड करा.
  3. "D5500Update" नावाच्या फोल्डरमध्ये खालील फाईल बाहेर काढण्यासाठी F-D5500-V102W.exe चालवा:
    • D5500_0102.bin (कॅमेरा फर्मवेअर)
  4. कार्ड खाच किंवा कार्ड वाचकाचा वापर करून कॅमेऱ्यामध्ये स्वरूपीत केलेल्या मेमरी कार्डवर "D5500_0102.bin" प्रतिलिपित करा.
  5. कॅमेरा मेमरी कार्ड खाचेमध्ये मेमरी कार्ड घाला आणि कॅमेरा चालू करा.
  6. मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  7. अद्यतन पूर्ण झाल्यानंतर, कॅमेरा बंद करा आणि मेमरी कार्ड बाहेर काढा.
  8. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतन झाले आहे याची पुष्टी करा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
DSLR_Firmup_Win_En.pdf (PDF) (0.21 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

उत्पादन विवरण
नाव D5500 "C" फर्मवेअर संस्करण 1.02
समर्थित कॅमेरे D5500
समर्थित कॅमरा फर्मवेअर संस्करणे "C" फर्मवेअर संस्करण 1.00–1.01
फाईल नाव F-D5500-V102M.dmg
ऑपरेटिंग सिस्टिम
  • macOS Sierra संस्करण 10.12
  • OS X 10.11.6
  • OS X 10.10.5
  • OS X 10.9.5
  • OS X 10.8.5
  • OS X 10.7.5
  • Mac OS X 10.6.8
नोट: कार्ड रीडर किंवा अंगभूत मेमरी कार्ड स्लॉट असलेला संगणक आवश्यक आहे.
सर्वहक्कस्वाधीन Nikon Corporation
अर्काइव्ह प्रकार स्वयं-एक्स्ट्रॅक्टिंग
प्रत्युत्पादन परवानगी नाही
कॅमेरा फर्मवेअर अद्यतन करणे
  1. F-D5500-V102M.dmg डाउनलोड करा.
  2. ज्यामध्ये खालील फाईल असते तो "D5500Update" नावाचा फोल्डर ज्‍याशी जोडलेला आहे ती डिस्क प्रतिमा माउंट करण्यासाठी F-D5500-V102M.dmg प्रतीकावर डबल क्लिक करा:
    • D5500_0102.bin (कॅमेरा फर्मवेअर)
  3. कार्ड खाच किंवा कार्ड वाचकाचा वापर करून कॅमेऱ्यामध्ये स्वरूपीत केलेल्या मेमरी कार्डवर "D5500_0102.bin" प्रतिलिपित करा.
  4. कॅमेरा मेमरी कार्ड खाचेमध्ये मेमरी कार्ड घाला आणि कॅमेरा चालू करा.
  5. मेनू सेटअप करा मध्ये फर्मवेअर संस्करण निवडा आणि फर्मवेअर अद्यतन पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
  6. अद्यतन पूर्ण झाल्यानंतर, कॅमेरा बंद करा आणि मेमरी कार्ड बाहेर काढा.
  7. फर्मवेअर नवीन संस्करणावर अद्यतन झाले आहे याची पुष्टी करा.

नोट: अद्यतन पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपकरणाविषयी अधिक विस्तृत सूचना किंवा माहितीसाठी खालील pdf फाईल डाउनलोड करा:
DSLR_Firmup_Mac_En.pdf (PDF) (0.17 MB)

नोट: आपल्याकरिता अद्यतने Nikon-अधिकृत सेवा प्रतिनिधीद्वारे केले जाऊ शकतात.

अंतिम उपभोक्ता परवाना करार

PDF फाईल्स विनामुल्य Adobe® Reader® सॉफ्टवेअर वापरून पाहिल्या जाऊ शकतात.
Adobe® Reader® डाउनलोड करा.